श्री देवी हेदुबाई देवस्थान

खुडी ता.देवगड जि.सिंधुदुर्ग

aaihedubai.jpg

खुडी गावाचे ग्रामदैवत मायमाउली श्री देवी हेदुबाई! कोकणामधील देवगड तालुक्यातील हिरव्यागार डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या खुडी गावाची ग्रामदैवता माय माऊली श्री देवी हेदुबाई.
खुडी गावातील हे प्रमुख मंदिर आहे. 'उत्पती एकादशी' पासून सात दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताह हा येथील प्रमुख वौशिष्ट असून देव-दिपावली प्रमुख दिवस असतो.
आई हेदुबाईच्या शेजारी पावणाई देवी व पटकी देवीचे पाशान आहे.
  १२/१२/१९९४ ला मंदिराचे बांधकाम नव्याने करण्यात आले असून मंदिराचे दरवाजे अहोरात्र उघडे असतात.येथे आल्यावर समस्त भाविकांना लाभते संपुर्ण शांती, समाधान आणि प्रसन्नता. मंदिराच्या सभोवती जुनाट वृक्षांची दाचीवाटी, काजु,आंबा,फ़णस यांची वृक्ष आणि महाकाय वटवृक्ष तसेच मोहोर व फ़ुले यांचा वेगळाच गंध अशा विविधांगी निसर्गाची मुक्त उधळण येथे अनुभवास येते. भव्य स्वरुपातील श्री देवी हेदुबाई मंदिर प्रवेशद्वारावरील पायरीला स्पर्श करताच दिमाखदारपणे उभी असलेली मंदिराची वास्तु नजरेस पडते. मंदिराच्या समोर तीन दिपमाळ आहेत. शेजारी भावई देवीचे मंदिर आहे. मंदिरात सुंदर व आकर्षक मुर्ती आहे. हेदुबाई मंदिराच्या चारी बाजुला चिरेबंदी तटबंदी आहे.