श्री देवी हेदुबाई देवस्थान

खुडी ता.देवगड जि.सिंधुदूर्ग


अखंड हरिणाम सप्ताह


अखंड हरिनाम सप्ताह harinam saptah.jpg दरवर्षी कार्तिक शुद्ध उत्तप्त्ती एकादशीला सुरु होणारा हरीनाम_सप्ताह म्हणजे हजारो भाविकंचा कुंभ-मेळाच होय. घटस्थापना करुन हरीनाम सप्ताहाची सुरुवात होते. अष्टप्रहर अखंड टाळ मृदुंगांच्या नाद लहरींमध्येविठुरायाचेharinam saptah.jpg गुणगान गायिले जाते. देवगड,कवकवली,मालवण सहित वैभववाडी तालुक्यातील भजनीमेळे आपल्या सुस्वर स्वरांनी खुडीनगरीला प्रती पंढरपुर नगरीच harinam saptah.jpgबनवतात. संपुर्ण आवार हरीनामाने दुमदुमुन जाते. एकादशीपासुन रोज रात्री सात दिवस देवी हेदुबाई माऊलीची पालखी ढोल,ताशे,टाळ यांच्या गजरात विठुरायाच्या नामघोषात मंदीराभोवती प्रदक्षिणा करते.harinam saptah.jpgया हरीनाम सप्ताहात देव दिवाळीची रात्र तर भाविकांना भक्तीभावाची पर्वनीच देउन जाते. हे हरीनामपर्व डोळ्याचे पारणे फ़ेडणारे असते. या सोहळ्यास भाविक आवर्जुन उपस्थिती लावतात.harinam saptah.jpg आठव्या दिवशी सकाळी ५ वाजता काकडी आरत करुन त्यानंतर हंडी फ़ोडुन हरीनाम सप्ताहाची सांगता केली जाते. या दिवशी मंदिरामध्ये गावजेवण असते. या दिवसापासुन ८ दिवसांनी वार्षिक पारंपारीक दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला जातो.