श्री देवी हेदुबाई देवस्थान

खुडी ता.देवगड जि.सिंधुदूर्ग


देवीचा ईतिहास


खुडी हे सिंधुदूर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्याsabhamandap.jpg
ठिकाणापासुन रस्त्याने सुमारे ३५ कि.मी. अंतरावर असणारे एक छोटेसे गांव. अखंडनिवासिनी मायमाउली श्री. देवी हेदुबाई म्हणजे खुडीवासीयांचे ग्रामदैवत. पुर्वी गुराखी गुरे चरवण्यासाठी मळय येथे जात असत. एके दिवशी एका गुराख्याचा लक्ष एका झाडाखाली गेला.hedubai devalay.jpg
तेथे झाडाखाली एक पाशाण होते. त्या गुराख्याने ही गोष्ट गावक-यांना सांगितली. दुस-या दिवशी सगळे गावकरी तेथे गेले. आणि पाहीले असता ते पाशाण देवीचे होते. गावक-यांनी पाशाणाला त्याच हेदीच्याhedubaideepmal.jpg
झाडाखाली ठेवायचा विचार केला. त्या ठिकाणी गवताची खोपटी बांधली. एक गुराखी दररोज देवीपुढे दिवा लावायचा. काही वर्षानंतर गुराखी दिवा लावुन घरी जात होता. कावळ्याने दिव्यातील वात नेऊन खोपटीवर ठेवली. खोपटी पेटायला लागली. खोपटी पेटताना पाहुन गु-याख्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. bhavay.jpg
आग काही विजेना. ही बातमी गावक-यांना समजली. गावक-यांनी पाशाण गावात स्थापित करायचे ठरवले. ही पाशाण डोंगरीच्या भरडावर स्थापन करायचे असे ठरले. आणि डोंगरीच्या भरडावर उदयास आली एक भव्य-दिव्य वास्तु. देवीला या मंदिरात स्थापन करण्यात आले. आता गावक-यांसमोरvatruksh.jpg
प्रश्न पडला देवीला कोणत्या नावाने हाक मारायची? काही गावक-यांनी सांगितले की, देवीचे पाशाण हेदिच्या भाटीत होते म्हणुन देवीला हेदुबाई असे नाव ठेऊया. म्हणुन त्या पाशाणाला हेदुबाई नाव ठेवण्यात आले.